चावलेल्या सापालाच घेऊन गेला दवाखान्यात व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Snake bite सापाचा विषय जरी निघाला तरी अनेकांना धडकी भरते. घनदाट जंगलात, खेडेगावात साप दिसला, तर त्याचे आश्चर्य आपल्याला वाटणार नाही. पण, तुम्ही असेच घरी बसलाय आणि अचानक तुमच्या बाजूला साप दिसला, तर नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. सापाला पाहून तुम्हाला घाम तर फुटेलच; पण त्या ठिकाणाहून तुम्ही लगेच पळ काढाल.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

काही साप विषारी असतात, तर काही बिनविषारी. सर्पमित्रांना याबद्दल जास्त माहिती असते. पण, अनेकांना त्याची काहीच माहिती नसल्याने साप पाहताच थरकाप उडतो. जर सापाने दंश केला आणि वेळेत उपचार झाले नाहीत, तर माणसाचा जीवही जाऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात सापाने दंश केला म्हणून माणसाने चक्क रुग्णालयात त्या सापालादेखील आणले.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक माणूस एका रुग्णालयात चक्क सापाला घेऊन आला आहे. त्याला सापाने दंश केला म्हणून तो चक्क सापालाच घेऊन रुग्णालयात आला. नेमका हा कोणता साप आहे आणि त्याच्या दंशामुळे नेमकी किती प्रमाणात विषबाधा झाली हे जाणून घेण्यासाठी तो सापाच्या मानेला पकडून, त्यालाच रुग्णालयात घेऊन आला. सापाला घेऊन आलेल्या त्या माणसाला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. व्हिडीओमध्ये हा माणूस एका हाताला पट्टी बांधून सापाला घेऊन रुग्णालयात आला आणि अंगात त्राण नसल्यानो तो रुग्णालयातील जमिनीवरच झोपला; पण त्याने सापावरची पकड सोडली नाही.

 

Leave a Comment