“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं

Running game ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणायचे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. हो, प्रेम कधी कुठे कोणासोबत होईल यांचं काही नेम नाही. तसंच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रेम बॉलिवूडमधील कलाकारांचे असो किंवा सर्वसामान्यांचे प्रेम हे प्रेम असतं. ती एक खूप सुंदर भावना आहे. सोशल मीडियावर आपण दररोज अनेक व्हिडीओ पाहतो ज्यात कपल आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करतात. तर या सोशल मीडियावर कपलचे अनेक मजेदार व्हिडीओही आपल्याला पाहिला मिळतात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

दरम्यान आपल्याकडे अनेक कार्यक्रम असतात ज्यामध्ये खास कपलसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, गेम असतात. संगीत खुर्ची किंवा मग दमशेरास वगैरे.. पण तुम्ही कधी बायकोला उचलून धावायची स्पर्धा पाहिलीये का? नाही ना.. मग हा व्हिडीओ पाहा, हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसू रोखू शकणार नाही.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सगळ्या नवऱ्यांनी आपल्या बायकांना हातावर उचलून घेतलं आहे. यावेळी सहा जोड्या याठिकाणी दिसत आहेत. आपल्या बायकोला घेऊन धावण्याची ही स्पर्धा असून यामध्ये कोण जिंकणार असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. ही स्पर्धा बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दीही व्हिडीओमध्ये दिसत आहे. अखेर स्पर्धा सुरु होते आणि सगळे नवरे आपआपल्या बायकोला उचलून धावू लागतात. यावेळी स्पर्धा जिंकणं सोडा पण सहाच्या सहा जोड्या जोरदार जमीनीवर आपटतात. धावत गेल्यामुळे प्रत्येकाचा तोल गेला आणि प्रत्येक पुरुष आपल्या बायकोला घेऊन जोरदार मैदानावर पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच हसू अनावर झालं आहे.

 

Leave a Comment