वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
Railway accident ‘अति घाई, संकटात नेई’ हे वाक्य आपण सर्वांनीच ऐकले असेल. कारण, वेगळ्या मार्गाने जाऊन धोका पत्करण्यापेक्षा सुरक्षितपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचणे नेहमीच चांगले असते, हाच या वाक्याचा अर्थ आहे. परंतु काही लोक या साध्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचे गंभीर परिणाम भोगतात.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वेचे रूळ ओलांडू नयेत आणि एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी नेहमी पादचारी पुलाचा वापर करावा, असे वारंवार सांगितले जाते. तरीही अनेक प्रवासी पुलावरून जाण्याचा कंटाळा करतात किंवा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. त्यांच्या या निष्काळजीपणामुळे अनेकदा गंभीर अपघात घडतात आणि काहीवेळा तर लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. अनेकजण ऑफिसला उशीर झाल्यामुळे धावपळीत चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
असाच एक हृदयद्रावक अपघात घाटकोपर रेल्वे स्टेशनवर घडला आहे. यात एक व्यक्ती रेल्वेच्या चाकाखाली सापडला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की घाटकोपर रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीचा किती भयानक अपघात झाला आहे. तो रेल्वेच्या चाकांमध्ये अडकला आहे आणि ट्रेन थांबलेली आहे. इतर प्रवासी आणि पोलीस मिळून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा भीषण अपघात पाहिल्यानंतर रूळ ओलांडण्यापूर्वी किंवा धावत्या गाडीत चढण्यापूर्वी तुम्ही नक्कीच विचार कराल. जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झाला असेल आणि वेळेवर पोहोचण्यासाठी तुम्ही रेल्वे रूळ ओलांडण्याचा विचार करत असाल, तर स्वतःला थांबवा. कारण, मृत्यू कधी आणि कसा येईल हे कोणालाच माहीत नसते. तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला हे सुंदर जीवन गमवावे लागू शकते.