दररोज 100 रुपयांची गुंतवणूक आणि पाच वर्षात होणार लाखोंची कमाई, जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या स्किमबाबत November 14, 2024 by Abhi Post office scheme पोस्ट ऑफिसमधील गुंतवणून सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे देशभरातील गुंतवणूकदार काही अंशी का होईना पोस्ट ऑफिस गुंतवणुकीला प्राधान्य देतात. पण गुंतवणूक किंवा बचत करण्यासाठी हाती पैसा तर हवा ना. त्यामुळे अनेकजण हात आखुडता घेतात. बचत आज उद्या असं करत वेळ निघून जाते. त्यामुळे योग्य वेळी योग्य बचत केली तर फायदेशीर ठरते. त्यामुळे घरातील लहानग्यांना कमी वयातच बचतीचं महत्त्व सांगितलं पाहीजे. पोस्ट ऑफिस योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे गुंतवणूक केली तर भविष्यात फायदेशीर ठरू शकते. जर गुंतवणूक करायची आहे आणि जोखिमही घ्यायची नसेल, तर पोस्ट ऑफिस गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिट हा चांगला पर्याय ठरू शकतो. या स्किमला अनेक जण शॉर्ट फॉर्ममध्ये आरडी असं संबोधतात. पोस्ट ऑफिसमधील ही योजना पाच वर्षांसाठी आहे. या योजनेत दर दिवसाला फक्त 100 रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षात लाखो रुपयांची कमाई होईल. पोस्ट ऑफिस योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा दररोज 100 रुपयांची गुंतवणूक केली तर महिन्याकाठी 3000 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. म्हणजेच दर महिन्याला 3000 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. वर्षाला तुमच्या खात्यात 36 हजार रुपये जमा होतील. याच पाच वर्षांचं गणित पकडलं तर 1 लाख 80 हजार रुपये जमा होतील. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये 6.7 टक्के व्याज मिळतो. म्हणजेत पाच वर्षात तुम्हाला तुमच्या जमा राशीवर 34,097 रुपये मिळतील. याचा अर्थ असा की पाच वर्षांनी तुम्हाला तुमची मुद्दल अधिक व्याज पकडून 2 लाख 17 हजार 97 रुपये मिळतील. कमी गुंतवणुकीत तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. छोट्या गुंतवणुकीमुळे कधी इतकी मोठी रक्कम झाली याचा पत्ता देखील लागणार आहे. भविष्यात अडीअडचणीच्या काळात या पैशांची मदत होऊ शकते. पोस्ट ऑफिस योजनेचा फायदा घेण्यासाठी येथे क्लिक करा विशेष म्हणजे गरजेवेळी या आरडीवर तुम्ही कर्जही घेऊ शकता. नियमानुसार, आरडीचे 12 हप्ते जमा केल्यानंतर खात्यात जमा असलेल्या रकमेच्या 50 टक्के लोन मिळू शकतं. हे कर्ज एक दमात किंवा हप्त्याने भरण्याची मुभा देखील मिळते. आरडीवर मिळणाऱ्या व्याजाच्या 2 टक्के अधिक व्याज कर्जासाठी भरावं लागतं. दरम्यान, गरजेवेळी हे खातं तु्म्ही बंद करून पैसे काढू शकता. आरडी ओपन केल्यापासून तीन वर्षानंतर कधीही खातं बंद करून पैसे काढू शकता. इतकंच काय तर मुदतीच्या एक दिवस आधीही पैसे काढू शकता.