महाविकास आघाडीकडे चालकच नाही…
महाविकास आघाडीच्या गाडीत चाके नाही, ब्रेक नाही. तसेच चालकांच्या सीटवर बसण्यासाठी भांडणे होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात आधी सरकारला लुटले. त्यानंतर विकास कामे थांबवली. त्यांनी मेट्रोची काम रोखली. समृद्धी महामार्गाचे काम थांबवले. त्यांनी महाराष्ट्रातील विकासाची प्रत्येक योजना थांबवली. त्यानंतर राज्यात महायुतीची सरकार बनली. त्यानंतर अडीच वर्षांत विकास चौफर झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विकास भरभरुन झाला आहे. आता महाराष्ट्रातील मतदारांनी लक्षात ठेवा महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.
महिलांना जास्त अधिकार दिले
महायुतीने वचननामा जाहीर केला आहे. त्यांच्या दहा वचनांची चर्चा होत आहे. जनतेच्या सूचनांमधून हा वचननामा तयार झाला आहे. महायुतीचा वचननामा विकसित भारताचा आधार बनणार आहे. विकसित महाराष्ट्र, विकसित भारतासाठी आमच्या बहिणींचे जीवन चांगले बनवणे गरजेचे आहे. महिला पुढे जातील तर संपूर्ण समाज प्रगती करेल. त्यामुळे मागील दहा वर्षांत केंद्र सरकारने महिलांना केंद्रात ठेऊन काम केले. महिलांसाठी आम्ही सर्व दरवाजे उघडले. त्यांना अधिकार दिले. महाराष्ट्राची महायुती सरकार केंद्राच्या पावलापाऊल ठेवून काम करत आहे. महिलांसाठी अनेक योजना सुरु आहे.