विधानसभा निवडणूक कोण कुठे आणि किती जागा जिंकणार, संपूर्ण यादीच आली समोर

Election results 2024 महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीपूर्वी Matrize चा सर्व्हे समोर आला आहे. ज्यामद्ये महाराष्ट्रातील सत्ता आणि महायुती-महाविकास आघाडीचं भवितव्य काय असणार हे देखील समोर आलं आहे. सर्वेक्षणात प्रदेशनिहाय किती जागा कोणाला मिळणार? हे देखील आता समोर आलं आहे.

विभागनिहाय किती जागा कोणाला मिळणार हे

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मेटेरिझच्या सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे सरकार स्थापन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (SP) यांना धक्का बसणार आहे. सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांपैकी महायुती आघाडीला 145-165 जागा मिळतील, तर विरोधी पक्ष MVA ला 106-126 जागा मिळतील असा अंदाज आहे.

विभागनिहाय किती जागा कोणाला मिळणार हे

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणाला किती टक्के मते मिळणार?

मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास सत्ताधारी महायुती आघाडी विरोधकांवर मात करण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला 47 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस आघाडीला 41 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणात, इतरांना 12% मते मिळतील असा अंदाज आहे.

 

 

Leave a Comment