- लाडकी बहीण योजनेतील महिलांना १५०० रुपयांवरुन २१०० रुपये दिले जाणार
- महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण
- महिलांच्या सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार
- शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार
- शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२ हजार वरुन १५ हजार
- प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार
- वृद्ध पेन्शन धारकांना १५०० वरुन २१०० रुपये दिले जाणार
- जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार
- २५ लाख रोजगार निर्मिती
- महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन
- ग्रामीण भागात ४५ हजार गावात पांधण रस्ते बांधणार
- अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढ करुन त्यांना दर महिना १५ हजार वेतन आणि विमा संरक्षण देणार
- वीज बिलात ३० टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार
- सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत व्हिजन महाराष्ट्र @२०२९ सादर केले जाणार
- २०२८ पर्यंत महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य
- मेक इन महाराष्ट्र धोरण राबवणार
- महाराष्ट्राला जागतिक फिनटेक आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) राजधानी बनवणार
- पहिल्या विशेष AI विद्यापीठाची स्थापना करणार
- नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवणार
- शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील जीएसटी अनुदानाच्या रुपात परत देणार
- शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ६००० भाव मिळावा म्हणून सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण शृंखलेची स्थापन
- २०२७ पर्यंत महाराष्ट्रात ५० लक्ष लखपती दीदी तयार करणार प्रत्येकी ५०० स्वयंसहायता गटाचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि १००० कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येणार
- अक्षय अन्न योजनेतंर्गत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिधा देण्यात येणार, यात तांदूळ, ज्वारी, शेंगदाण्याचे तेल, मीठ, साखर, हळद, मोहरी, जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असणार
- महारथी अटल टिंकरिंग लॅब्स योजना सुरु करणार
- महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करण्यात येणार
- छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार. यात को वर्किंग स्पेस, इनक्युबेशन सुविधा असतील. यातून १० लाख नवीन उद्योजक तयार केले जाणार