तारीख जाहीर ! दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार

HSC SSC Result राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाची उत्सुकता

 

 

दहावीचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

राज्यातील शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे. शिक्षण मंडळातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी निकाल मागील वर्षीच्या तुलनेत लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल २० मे नंतर जाहीर झाला होता, परंतु यावर्षी सुमारे दहा दिवस अगोदर निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दहावीचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता बारावीचा निकाल ९ मे रोजी तर इयत्ता दहावीचा निकाल १५ मे च्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.

मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती, कोल्हापूर आणि मुंबई विभागातील इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी मंडळाकडून सतत पाठपुरावा करण्यात येत होता. तपासलेल्या उत्तरपत्रिका मंडळाकडे जमा करण्याची अंतिम मुदत ८ एप्रिल होती आणि त्या वेळेत जवळपास सर्व उत्तरपत्रिका जमा झाल्या आहेत.

दहावीचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

यावर्षी शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील लवकर घेतल्या होत्या. इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. परीक्षा लवकर झाल्यामुळे निकाल देखील लवकर लागेल, असे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया जून महिन्यात सुरू होणार असल्याने, यंदा मे महिन्यातच निकाल जाहीर करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. निकालाची अधिकृत तारीख अद्याप मंडळाने जाहीर केलेली नाही, परंतु विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल ९ मे आणि दहावीचा निकाल १५ मे च्या आसपास लागण्याची शक्यता आहे.

दहावीचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

प्रवेश प्रक्रियेला लवकर सुरुवात

बारावीचा निकाल १५ मे रोजी जाहीर झाल्यानंतर त्वरित पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. तर, दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे नियोजन करत असाल, तर या संभाव्य तारखा लक्षात घेणे तुमच्यासाठी सोयीचे ठरू शकते. विशेषतः महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडेल.

Leave a Comment