दहावीच्या परीक्षा बद्दल मोठे अपडेट करण्यात आला मोठा बदल November 12, 2024 by Abhi ssc exam एसएससी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार गणित आणि विज्ञान या विषयांत ३५ गुणांपेक्षा कमी आणि २० गुणांपेक्षा अधिक गुण असल्यास अकरावीला प्रवेश घेता येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने अंतिम मान्यता दिली आहे. दहावी परीक्षांची वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा हा आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा घेण्यात येते. प्रचलित पद्धतीनुसार दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी सर्व विषयांत किमान ३५ गुण मिळवावे लागतात. मात्र, अनेकांना गणित, विज्ञान विषयांची भीती वाटते. दहावी परीक्षांची वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा त्या दडपणाखाली अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात, त्यांना सत्र कायम ठेवण्याची मुभा (एटीकेटी) असल्याने अकरावीला प्रवेश मिळतो, पण पुरवणी परीक्षा देऊन अनुत्तीर्ण विषयांत उत्तीर्ण व्हावे लागते. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणाऱ्या बदलानुसार दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यान गणित आणि विज्ञान या विषयांत ३५ पेक्षा कमी आणि २० पेक्षा जास्त गुण मिळविल्यास त्या विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे.