विभागनिहाय किती जागा कोणाला मिळणार?

मेटेरिझने विभागनिहाय सर्वेक्षण केलं आहे. पाहा महाराष्ट्रातील कोणत्या विभागात कोणाला किती जागा मिळू शकतात.

1. पश्चिम महाराष्ट्र:
महायुती – 70 जागांपैकी महायुतीला 31-38 जागा आणि 48 टक्के मते मिळू शकतील.
महाविकास आघाडी – MVA ला 70 जागांपैकी 29-32 जागा आणि पश्चिम महाराष्ट्रात 40 टक्के मते मिळतील असा अंदाज
2. विदर्भ:
महायुती – महायुतीला विदर्भात 62 जागांपैकी 32-37 जागा आणि 48 टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
महाविकास आघाडी – विदर्भात 62 जागांपैकी 21-26 जागा आणि 39 टक्के मतं ही महाविकास आघाडीला मिळू शकतात.
3. मराठवाडा:
महायुती – 46 जागांपैकी 18-24 जागा. मराठवाड्यात 47 टक्के मते महायुतीला मिळतील असा अंदाज
महाविकास आघाडी – मराठवाड्यातील 46 जागांपैकी 20-24 जागा आणि 44 टक्के मते मिळतील असा सर्व्हेमध्ये अंदाज
4. ठाणे-कोकण:
महायुती – ठाणे-कोकण विभागातील 39 जागांपैकी 23-25 आणि 52 टक्केवारी मते महायुतीला मिळू शकतात.
महाविकास आघाडी – ठाणे-कोकण विभागातील 39 पैकी 10-11 जागा आणि 32 टक्के मते महाविकास आघाडीला मिळू शकतात.
5. मुंबई:
महायुती – मुंबईला 36 जागांपैकी 21-26 जागा मिळतील आणि 47 टक्के मते मिळतील, असं सर्व्हेमध्ये म्हटलंय.
महाविकास आघाडी – 36 जागांपैकी 10-13 जागा आणि मुंबईत 41 टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
6. उत्तर महाराष्ट्र:
महायुती – उत्तर महाराष्ट्रातील 35 जागांपैकी 14-16 जागा महायुतीला मिळतील असं अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महाविकास आघाडी – उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 जागांपैकी 16-19 जागा आणि 47 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा>> Ajit Pawar: ‘मी यावेळेस मुख्यमंत्रीपदाच्या भानगडीतच…’, अजितदादांनी उडवून दिली खळबळ
सर्व्हेचा सॅम्पल साइज किती?
10 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान मॅटेराइजचे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. नमुन्याच्या आकाराबद्दल सांगायचे तर, सर्वेक्षणात राज्यातील 1,09,628 लोकांची मते घेण्यात आली आहेत. यामध्ये 57 हजारांहून अधिक पुरुष, 28 हजार महिला आणि 24 हजार तरुणांच्या मतांचा समावेश आहे.