महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काय काय?

-शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी,नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट
-आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार
-जाती जणगणनना करणार
⁠-300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत
-दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार
-2.5 लाख नोकरभरती करणार
-शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती
-शेतमालाला हमीभाव देणार,पीकविम्याच्या जाचक अटी काढणार
-सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन
-अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार
-बार्टी,महाज्योती,सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार
-एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार
-महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार
-महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार
-महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करु
-शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार
-सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
⁠-डॉय बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवणार
-महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार
-बिनाव्याज पाच लाख कर्ज देणार
-कंत्राटी नोकरभरती बंद करणार

महाविकास आघाडी पहिल्या 100 दिवसांत काय करणार?
-महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रु.देणार
-महिलांचा बस प्रवास मोफत करणार
-सहा घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांत देणार
-महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार
-जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार